
नाशिक- त्र्यंबकेश्वर रोड कुंभमेळ्यासाठी रुंदीकरण
बातमी थोडक्यात
सिहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आल्याने नाशिक- त्र्यंबकेश्वर रोड रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. लाखो भाविकांची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दोन तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा रोड प्राधान्याने सुरू आहे. कुंभमेळ्यापूर्वी वाहतूक आणि शाही स्नान सुरळीत व्हावे, यासाठी प्रशासनाने काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.