
रासायनिक गोदामाचा स्फोट उरण हादरले
बातमी थोडक्यात
उरणच्या वेश्वी ग्रामपंचायत परिसरातील रासायनिक गोदामात भीषण आग लागून मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे उरण हादरले. स्फोटाच्या आवाजाने नागरिकांमध्ये घबराट पसरली. धुरामुळे काहींना श्वास घेण्यास त्रास झाला. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. गोदामाचा मालक घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेनंतर औद्योगिक सुरक्षा नियमांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.