
जय शाह यांची आयसीसी चे अध्यक्षपदी बिनविरोध पुनर्नियुक्ती
बातमी थोडक्यात
बाली येथे झालेल्या आयसीसी संचालकांच्या बैठकीत जय शाह यांना आयसीसी चे अध्यक्षपदी बिनविरोध पुनर्नियुक्ती करण्यात आली. ते पुढील दोन वर्षे आयसीसी चे नेतृत्व करतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे वर्चस्व कायम राहील. आयसीसी बोर्डाच्या विश्वासाबद्दल शाह यांनी आभार व्यक्त केले. क्रिकेटच्या जागतिक विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे शाह यांनी सांगितले.