
राजदीप कॉटन मिल आग: श्रीगोंड्यात चार कोटींचे कापसाचे गठ्ठे जळून खाक
बातमी थोडक्यात
श्रीगोंड्यातील राजदीप कॉटन जिनिंग मिलमध्ये भीषण आग लागून चार कोटींचे कापसाचे गठ्ठे जळून खाक झाले. श्रीगोंडा व दौंड पालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांना आग विझवण्यासाठी चार तास लागले. आग विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे लागली की जाणीवपूर्वक लागली याचा तपास पोलीस करत आहेत.