
संसदेचे हिवाळी अधिवेशन डिसेंबर २०२६ च्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे.
बातमी थोडक्यात
संसदेचे हिवाळी अधिवेशन डिसेंबर २०२६ च्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार असून महिला आरक्षण विधेयकावर विशेष भर दिला जाणार आहे. लोकसभेच्या जागा ८५० पर्यंत वाढवण्यासाठी आणि संसदेत व राज्य विधिमंडळांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के जागा राखीव करण्यासाठी सरकार घटना दुरुस्ती विधेयक मंजूर करण्याच्या तयारीत आहे. हे विधेयक मंजूर होण्यासाठी दोन-तृतीयांश बहुमत आवश्यक आहे.