
निमगाव साव्यात मोबाईल टॉवरला आग
बातमी थोडक्यात
निमगाव साव्यात रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मोबाईल टॉवरला भीषण आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. उंच इमारतीवर असलेल्या टॉवरला अचानक आग लागली आणि ती वेगाने पसरली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. काही वेळातच आग नियंत्रणात आली.