मंगळवारपासून ३४ हजार न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा अनिश्चित काळासाठी संप
बातमी थोडक्यात
राज्यभरातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी वेतन आणि सेवाविषयक मागण्या अद्याप पूर्ण न झाल्याने मंगळवारपासून अनिश्चित काळासाठी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी संघटनेने संपाची घोषणा केली असून, त्यामुळे कनिष्ठ न्यायालयातील कामकाज विस्कळीत होऊ शकते. संघटनेने सरकारकडे अनेकदा निवेदने दिली आहेत, परंतु अद्याप या प्रश्नाचे निरसन झालेले नाही.