
वाडनेर दुमाला येथील वालदेवी नदीच्या तीरावर छटापूजन संपन्न
बातमी थोडक्यात
वालदेवी नदीच्या तीरावर ब्रह्मगिरी घाटावर केशव तात्या पोरजे यांच्या हस्ते छटापूजन संपन्न झाले. वाडनेर दुमाला, वाडनेर गेट येथील उत्तर भारतीय बंधू सहभागी झाले होते. मावळत्या सूर्याला महिलांनी अर्घ्य दिले. कुटुंबीयांचे कल्याण व आरोग्य लाभो, यासाठी भाविकांनी उपवास केला.