
लातूरमध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन ते चार जण जखमी झाले आहेत.
बातमी थोडक्यात
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील तवशी ताड परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन ते चार जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी धावलेल्या स्थानिकांनी जखमींना मदत केली व त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदारांना घेऊन जात असताना हा अपघात झाल्याचा संशय आहे. कारचा नेमका वेग, नियंत्रण सुटल्याची कारणे व नेमके अपघात कशामुळे झाले याचा तपास पोलीस करत आहेत.