
आंबे गावात विहीर खोदताना कठडा कोसळून चार मजुरांचा मृत्यू
बातमी थोडक्यात
आंबे गावात विहीर खोदताना विहिरीचा कठडा कोसळून चार मजुरांचा मृत्यू झाला. सकाळी १० च्या सुमारास शेतकरी निवास शिंदे यांच्या मालकीच्या ५० फूट खोल विहिरीवर मजुरांनी मोजमाप करण्याचे काम करत असताना ही घटना घडली. अचानक कोसळल्याने कामगार मातीखाली दबले गेले. प्रशासनाने व गावकऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. आंबे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या दुर्घटनेने मृतांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.