
पुणे-नाशिक रेल्वे चळवळीची थेट कृतीसाठी तयारी
बातमी थोडक्यात
पुणे-नाशिक रेल्वे कृती समितीने अलेफटा येथे रेल्वे मार्गाच्या अंतिम आराखड्यावर शिक्कामोर्तब केले. रेल्वे मार्गाचा ग्रामीण भागाला फायदा व्हावा यासाठी सरळ मार्ग मिळवणे हा या कृतीचा उद्देश आहे. चाकण ते सिन्नरपर्यंत नागरिकांना एकत्र आणण्यासाठी पुढील आठवड्यात जनजागृती व प्रतिनिधींच्या भेटींचे नियोजन करण्यात आले आहे. सरळ मार्गामुळे पुणे, नगर, नाशिकचा विकास होईल.