
एसबीआय सर्व्हर हॅक, 3.75 लाख रेकॉर्ड चोरीला
बातमी थोडक्यात
नवी मुंबईतील सीबीडी-बेलापूर येथील ग्लोबल आयटी सेंटरमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व्हरवर मोठ्या प्रमाणात हॅकर हल्ला झाला असून 3.75 लाख ग्राहकांचे रेकॉर्ड चोरीला गेले आहेत. चोरीला गेलेल्या डेटामध्ये नावे, मोबाईल नंबर, लोन ॲप्लिकेशन इत्यादी माहिती डार्क वेबवर अपलोड करण्यात आली आहे. बँकेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. लाखो ग्राहकांच्या गोपनीय माहितीची सुरक्षा आता धोक्यात आली आहे.