
ॲम्बल : ऐतिहासिक स्पर्धेत मुलांनी बांधले किल्ले
बातमी थोडक्यात
ॲम्बल येथे किल्ल्यांच्या बांधणी स्पर्धेत ४० मुलांनी ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या. विठ्ठल रामचंद्र जगताप मित्र परिवारच्या वतीने आयोजित या स्पर्धेचे परीक्षण प्रा. समीर कुंभारकर यांनी केले. विजेत्यांना रोख बक्षिसे व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. शिव इतिहासाची व ऐतिहासिक वारशाची आवड निर्माण करणाऱ्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.