
सातारा : घरगुती गॅस सिलिंडरची काळाबाजार
बातमी थोडक्यात
सातारा जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरची काळाबाजार वाढत असून नागरिकांना घरगुती सिलिंडरसाठी एजन्सीच्या अनेक फेऱ्या माराव्या लागत आहेत. घरगुती सिलिंडर हा निवासी वापरासाठी असूनही हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळींमध्ये वापरला जात आहे. वितरण होण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी वाढल्या असून गृहिणींना सणासुदीच्या काळात पर्याय शोधण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.