इंडियन बँकेच्या अधिकाऱ्याची आत्महत्या, कराडमध्ये गुन्हा दाखल
बातमी थोडक्यात
उपप्रादेशिक अधिकारी मैथिली शरण सावला आणि प्रादेशिक अधिकारी अर्चना सहदेव यांच्या त्रासामुळे इंडियन बँकेचे कराड येथील अधिकारी रविकिरण केशव लाडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. कामाच्या ठिकाणी रविकिरण यांना अपमानजनक वागणूक आणि शिवीगाळ होत असल्याने ते मानसिक त्रासाला सामोरे जात होते, अशी तक्रार त्यांच्या भावाने केली आहे. पोलिसांनी अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.