
कराड जवळ वाहन धडकून बिबट्या जखमी
बातमी थोडक्यात
पुणे बंगळूरु महामार्गावर पाचवड फाट्याजवळ शुक्रवारी रात्री अज्ञात वाहनाशी झालेल्या धडकेत बिबट्या जखमी झाला. मागील दोन्ही पायाला दुखापत झाल्याने तो प्राणी ऊसाच्या शेतात पळाला. बिबट्या शोधण्यासाठी वनविभागाकडून ड्रोनचा वापर केला जात असून, संध्याकाळपर्यंत तो सापडला नाही. शेतात घुसल्यानंतर बिबट्या शेतकऱ्यांवर हल्ला करेल, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.