
छत्रपती संभाजीनगर मधील धार्मिक भूमीवर अनधिकृत भूखंड विक्री
बातमी थोडक्यात
जाधववाडी येथील श्रीराम मंदिर संस्थान व बालाजी मठाच्या मालकीच्या ४१ एकर जमिनीवर बेकायदा भूखंड केल्याचा आरोप. धार्मिक भूमीचा व्यापारी कारणांसाठी गैरवापर होत असल्याचा आरोप. महापालिका आयुक्त व नियंत्रक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर एमआयएम नेते समीर साजिद बिल्डर यांनी महापालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला. फोन आल्यानंतर कारवाई थांबवण्यात आली. फोन कुठून आला याची माहिती लोकप्रतिनिधींनी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.