
महापालिकेच्या बैठकीत पाणी खर्चाला मंजुरी
बातमी थोडक्यात
पाणी प्रश्नांच्या प्रलंबित मुद्यांवरून व सांडपाणी व्यवस्थापनाचे काम अपूर्ण असल्यावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर टीका केली. अनेक भागांमध्ये टँकर पाणीपुरवठा होण्यास विलंब होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सांडपाणी व्यवस्थापनाचे काम पूर्ण करून टँकर पाणी देण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला.