
चंद्रपूर : वेझगाव मध्ये अवैध वाळू घाट
बातमी थोडक्यात
गोंदपिंपरी तालुक्यातील वेझगाव मध्ये अनधिकृत वाळू घाट व हजारो ब्रास वाळू साठे तयार झाल्याने शासनाचा महसूल बुडत आहे. महसूल विभाग गप्प असल्याने अवैध कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची नागरिकांची मागणी आहे. जिल्हाधिकारी वसुमाना पंत व खाण विभाग यांच्यामार्फत संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.