
मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक
बातमी थोडक्यात
मध्य व पश्चिम रेल्वेने रविवार, दि.१५ नोव्हेंबर रोजी मुख्य व हार्बर मार्गावर अभियांत्रिकी व देखभाल कामासाठी मेगा ब्लॉकची घोषणा केली आहे. सीएसएमटी ते पनवेल हार्बर व पनवेल-ठाणे ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा ६ तासांसाठी बंद राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी विभागात विशेष लोकल गाड्या धावतील.