
कर्जातमधून ऑनलाईन विवाह फसवणूक प्रकरणी इंजिनिअरला अटक
बातमी थोडक्यात
सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संदीप केशव चव्हाण या इंजिनिअरला कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने इंस्टाग्रामच्या माध्यमातून विश्वास निर्माण करून आर्थिक मदतीची मागणी केली होती. या प्रकरणी 27 ऑक्टोबर 2024 रोजी 7 लाख 2 हजार 372 रुपयांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील महिलांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आली असून काही प्रकरणांमध्ये अत्याचाराचे आरोपही करण्यात आले आहेत. या प्रकरणी कर्जत पोलीस पुढील तपास करत आहेत.