
अंजनाडी पुलावर आराम बसला धडक ट्रकची, २० जखमी
बातमी थोडक्यात
मुंबई-गोवा महामार्गावर अंजनाडी पुलाजवळ आराम बसला मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात बसमधील २० प्रवासी जखमी झाले. शुक्रवारी पहाटे ४ वाजता झालेल्या या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून वाहतूकही विस्कळीत झाली आहे. बचाव कर्मचार्यांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.