
उच्च न्यायालयाकडून ४४ सिंहगड संस्थांची सीबीआय चौकशीचे आदेश
बातमी थोडक्यात
८ वर्षांपासून कर्मचाऱ्यांना पगार, पेन्शन न दिल्याने मुंबई उच्च न्यायालयाने सिंहगड तांत्रिक शिक्षण संस्थेला फटकारले. न्यायालयाकडून ट्रस्टचे खाती गोठवल्याने तसेच सीबीआय, ईडी, आयकर विभागाच्या चौकशीचे आदेश दिल्याने ४४ संस्थांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. न्यायालयाने ट्रस्टींना अवमान केल्याची कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.