
त्र्यंबकेश्वर मंदिरातील महिला सुरक्षा रक्षकाला मारहाण
बातमी थोडक्यात
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर दिवाळीच्या सुट्टीत महिला सुरक्षा रक्षकाला भाविकांनी धक्का मारल्याने झटापट झाली. या घटनेमुळे व्हीआयपी रांगेतील भाविकांना दर्शनाला उशीर झाला. याप्रकरणी सुरक्षा रक्षकाने त्र्यंबक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.