
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होत आहे
बातमी थोडक्यात
बंगालच्या उपसागरात १५ नोव्हेंबर रोजी कमी दाबाचा पट्टा तीव्र होऊन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्राला सध्या संभाव्य चक्रीवादळाचा मोठा धोका नाही.