
नोव्हेंबर २८ रोजी मासाप पदाधिकाऱ्यांविरोधात अविश्वास ठराव
बातमी थोडक्यात
मासाप पदाधिकाऱ्यांविरोधात २७ ऑक्टोबर रोजी कार्यकारी मंडळाने अविश्वास ठराव मांडला. योगेश सोमण, स्वाती महाळकण आणि प्रदीप निफाडकर यांच्यावर संवाद न साधणे, आर्थिक गैरव्यवहार यांसारख्या कारणांमुळे कार्यकारी मंडळाने अविश्वास ठराव मांडला आहे. कार्यकारी मंडळ २८ नोव्हेंबर रोजी या ठरावावर चर्चा करणार असून पदाधिकाऱ्यांना आपली बाजू मांडण्यासाठी १५ दिवसांचा वेळ देण्यात आला आहे.