
दिवाळी नाटक 'संगीत स्वरसम्राग्नी'ने पुण्याची मने जिंकली
बातमी थोडक्यात
श्रुति संगीत निकेतन आणि दीपोत्सव यांच्या वतीने आयोजित 'संगीत स्वरसम्राग्नी' या दिवाळी नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्याधर गोखले लिखित आणि माऊली सभागृहात सादर झालेल्या या नाटकाचे समर्पण जयमाला आणि कीर्ती शिलेदार यांना करण्यात आले. पाच तास चाललेल्या या नाटकाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.