
केपीएससी परीक्षेची तयारी ३४ केंद्रांवर सुरू
बातमी थोडक्यात
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी गुरुवारी केपीएससी परीक्षेची तयारी जाहीर केली असून, रविवारपासून पूर्व परीक्षा होणार आहे. ३४ केंद्रांवर १२ हजार ४३३ उमेदवार परीक्षा देणार आहेत. गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाईल जॅमरसह कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.