
पैठणच्या अधिकाऱ्यांकडून एचआयव्ही रुग्णांसाठी दिवाळी भेटवस्तूंचे आयोजन
बातमी थोडक्यात
ए.आर.टी. आणि आय.सी.टी.सी. पैठणच्या अधिकारी व कर्मचार्यांनी पैठणमधील ५० एचआयव्ही लाभार्थ्यांना दिवाळी भेटवस्तू व शाल देऊन मदत केली. दिवाळीच्या निमित्ताने डॉ. गौतम सवशे व डॉ. पंडित किल्लारीकर यांच्या पुढाकाराने जिल्हा लेखापाल अनिरुद्ध काळे यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे एचआयव्ही रुग्णांना आनंद झाला असून समाज जागृतीसाठी या उपक्रमाचे कौतुक होत आहे.