
गोळेगाव खुर्द येथे बस थांबा मंजूर
बातमी थोडक्यात
संभाजीनगर ते जळगाव महामार्गावरील गोळेगाव खुर्द येथे बस थांबा उभारण्यास मान्यता देण्यात आली. गोळेगाव खुर्द, उंडणगाव, पानवडोड व परिसरातील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, दिव्यांग प्रवाशांना थांबे नसल्याने गैरसोय होत होती. आता गोळेगाव खुर्द येथे प्रवासी चढ-उतर करू शकतील.