
जुन्या वादातून उल्हासनगरमध्ये तरुणावर गुंडांचा हल्ला
बातमी थोडक्यात
नेहरू चौकात झालेल्या जुन्या वादातून मध्यरात्री झालेल्या भांडणात शंकर रतन कांबळे यांच्यावर गरीबनगर परिसरात सात ते आठ जणांच्या टोळक्याने हल्ला केला. या टोळीने कांबळे यांच्या पोटावर वार केले. कांबळे यांच्यावर उल्हासनगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सुमित सुरडकर याला अटक करण्यात आली आहे, तर इतर फरार आहेत.