
पनवेलच्या तरुणाची ६० फूट खोल पाण्यातून सुटका
बातमी थोडक्यात
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणार्या कर्नाळा स्पोर्ट्सजवळच्या नव्या उड्डाणपुलावरून १६ वर्षांचा तरुण ५०-६० फूट खाली पडला. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोरखंड, हार्नेस आणि टॉर्चच्या साहाय्याने शिवांश दामले या तरुणाची सुखरूप सुटका केली व त्याला रुग्णालयात पाठविले. पनवेल महापालिकेने नागरिकांना या ठिकाणी गर्दी न करण्याचे व फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे.