
डहाणू मध्ये पकडला बिबट्या
बातमी थोडक्यात
तनाशी येथील भीमरपाडा येथे वासरांवर हल्ला करणारा बिबट्या वनविभागाच्या पथकाने थर्मल ड्रोन आणि कॅमेऱ्याच्या साहाय्याने पकडला. बिबट्या पकडल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. पकडलेल्या बिबट्याला वैद्यकीय तपासणी आणि ओळख पटवण्यासाठी ठाण्यातील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये नेण्यात येणार आहे.