
माजी १९८८ बॅचचे विद्यार्थी भिकमचंद खंडेलवाल विद्यालयात पुन्हा एकत्र
बातमी थोडक्यात
भिकमचंद खंडेलवाल विद्यालयाचे माजी विद्यार्थी डबकी रोडवरील शाळेत सलग बाराव्या वर्षी वार्षिक स्नेहसंमेलनासाठी एकत्र आले. दिवाळीच्या सुट्टीत अकोला येथे परतल्यानंतर त्यांनी शाळेचे व शिक्षकांचे संस्कार केल्याबद्दल आभार मानले. गायत्री बालिका आश्रमातील एका अनाथ मुलीची पालकत्त्व स्वीकारून तिच्या शैक्षणिक खर्चाची वर्षभराची जबाबदारी उचलून त्यांनी आपली सामाजिक जबाबदारीही पार पाडली.