
भाजप आमदाराची कन्हरगाव अभयारण्य प्रस्ताव रद्द करण्याची मागणी
बातमी थोडक्यात
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कन्हरगाव अभयारण्य प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी आणि सरपंच संघटनेने या प्रस्तावाला तीव्र विरोध केला असून अनेक ग्रामपंचायतींनी या विरोधात ठरावही पारित केले आहेत. कन्हरगाव अभयारण्य प्रस्तावाबाबत राज्य सरकारकडून निर्णय कधी येणार याकडे ४७ गावांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.