
दिवाळीत फटाके फोडल्याने चौघांवर गंगापूर पोलिसांची कारवाई
बातमी थोडक्यात
दिवाळीच्या निमित्ताने सार्वजनिक रस्त्यावर फटाके फोडून वाहतूक सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ९ नोव्हेंबर रोजी जून कायगाव चौकात ही घटना घडली. या घटनेनंतर १० तारखेला तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस अधिकारी विठ्ठल जाधव यांच्याकडून पुढील तपास सुरू आहे.