
दिवाळी नंतर महाराष्ट्रात थंडीचा इशारा
बातमी थोडक्यात
दिवाळी नंतर महाराष्ट्रात हवामानाचा मोठा बदल होणार असून सकाळी आणि रात्री थंडी जाणवणार आहे. भारतीय हवामान खात्याने पुढील काही दिवस कोरडे हवामान राहील असा अंदाज वर्तवला असून, ११ नोव्हेंबरला पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअस घट होण्याची शक्यता आहे.