
शासनाकडून शेतकरी ओळखपत्र देऊन दिलासा
बातमी थोडक्यात
१ जानेवारी २०१५ पूर्वी शेतीची जमीन लागवडीखाली असल्याची पावती देणारे 'शेतकरी ओळखपत्र' देऊन शेतकरी व भूमिहीन भाडेकरूंना दिलासा देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा सुमारे १ लाख ६० हजार शेतकऱ्यांना होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची घोषणा केली. प्रलंबित सर्वेक्षणांसाठी ऑफलाइन सुविधा सुरू करण्यात आल्या.