
अपात्र सदस्य असूनही पात्र कुटुंबांना धान्य पुरवठा सुरू करा
बातमी थोडक्यात
पीएम गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत कुटुंबातील एक सदस्य अपात्र ठरल्यास संपूर्ण कुटुंबाचा धान्य पुरवठा थांबवू नये, असे निर्देश राज्य अन्न आयोगाने राज्य सरकारला दिले. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने अन्नधान्याचा अभाव असणे योग्य नाही. पात्र सदस्यांना लाभ सुरू करण्यासाठी आयोगाने प्रत्यक्ष तपासणी करण्याचे आदेश दिले.