
जालना आग शेतकऱ्यांचे कुटुंब जळून खाक
बातमी थोडक्यात
दिवाळीच्या उत्सवात तळणीतील कानाडी शिवरा येथील पत्र्याचे शेड आगीत जळून खाक झाले. पाच क्विंटल कापूस, दहा क्विंटल सोयाबीन, घरगुती सामान जळून खाक झाले. दुष्काळामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या राठोड कुटुंबाला आता उपासमारीचा सामना करावा लागत आहे. रब्बी हंगाम हुकल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.