
गोकुळ निवडणूक: १३ संचालकांच्या पाठिंब्याने शशिकांत पाटील अर्ज दाखल करणार
बातमी थोडक्यात
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी १३ संचालकांच्या वतीने शशिकांत पाटील चोयेकर अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली. गोकुळ शिरगाव येथे अध्यक्षपदाचा निर्णय आज दुपारपर्यंत होण्याची शक्यता असल्याने शांतता राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निवडणुकीची पुढील रणनीती २४ तारखेला ठरवली जाईल.