
नाशिकची थंडी वाढली
बातमी थोडक्यात
नाशिक जिल्ह्यात किमान तापमानासह १४ अंश सेल्सिअसच्या आसपास थंडी कायम असून निफाडसारख्या ग्रामीण भागात थंडीने जोर धरला आहे. पहाटेच्या वेळी थंडीने नागरिक काकुळले आहेत. नाशिक शहरात किमान तापमान ९ नोव्हेंबर रोजी किंचित वाढून १४.३ अंश सेल्सिअस झाले, तर कमाल तापमान ३२.३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले.