
पाणीपुरवठ्यावर श्वेतपत्रिका देण्याची फेडरेशनची मागणी
बातमी थोडक्यात
पिंपरी-चिंचवड गृहनिर्माण संस्था महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्षानुवर्षे अपुरा व अनियमित पुरवठा होत असल्यामुळे पाणीपुरवठ्यावर श्वेतपत्रिका देण्याची मागणी केली आहे. नियमित पुरवठा होत नसल्याने रहिवाशांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. पाणी उपलब्धता, वितरण व खर्चाबाबत पारदर्शकता असावी, अशी फेडरेशनची मागणी आहे.