
दिवाळीच्या फटाक्यांमुळे अमरावतीचा ए. क्यू. आय. २८५ वर
बातमी थोडक्यात
दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे अमरावतीचा ए. क्यू. आय. ८०-९० च्या सामान्य पातळीपेक्षा २८५ वर गेला. रात्री ८ ते ११ या वेळेत प्रदूषणाची पातळी झपाट्याने वाढली. हवेत सूक्ष्म कण आणि रसायने जमा झाली. लहान मुले, वृद्ध आणि दमा असणाऱ्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास झाला आणि डोळ्यांना जळजळ झाली.