
चोरी रोखण्यासाठी तरुणांची ३३ गावांत गस्त
बातमी थोडक्यात
सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील ३३ गावातील तरुणांनी चोरी, घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रात्रीची गस्त सुरू केली. पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी पुन्हा सक्रिय केलेल्या ग्रामरक्षक दलाच्या वतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने मध्यरात्रीपासून पहाटे ४.३० वाजेपर्यंत प्रमुख भागांत गस्त सुरु करण्यात आली आहे. नागरिकांनी संशयास्पद हालचालींची माहिती देऊन पोलीस-नागरिक समन्वयाने सुरक्षा वाढवावी.