
गोकुळ अध्यक्ष निवडणूक 2026: ठरल्याप्रमाणे निवडणूक घेण्यास कोर्टाची मंजुरी
बातमी थोडक्यात
गोकुळ अध्यक्ष निवडणूक उद्या ठरल्याप्रमाणे घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मान्यता दिली. न्यायालयाने राज्यनियुक्त चार संचालकांचे मतदान वेगळे ठेवून संपूर्ण प्रक्रिया नोंदवण्याचे आदेश दिले. गोकुळमध्ये चार संचालकांची नियुक्ती करणारा राज्य सरकारचा अध्यादेश लोकशाहीला दाबून टाकणारा असल्याचा दावा करत समविचारी आघाडीने राज्य सरकारविरोधात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ नोव्हेंबरला आहे.