
महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार
बातमी थोडक्यात
भारतीय हवामान खात्याने पुढील चार दिवसांत किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअस घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात थंडीचा जोर वाढत असून बहुतांश भागात कोरडे आणि निरभ्र वातावरण राहील. नोव्हेंबर महिन्यात थंडीचा जोर हळूहळू वाढत आहे.