
संभाजीनगरमध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांना गांजा विकल्याबद्दल 22 वर्षीय तरुणीला अटक
बातमी थोडक्यात
संभाजीनगरमध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांना गांजा विकल्याबद्दल 22 वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली. आरोपीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना गांजाच्या आहारी नेले. राजनगरमधील एका शाळेजवळून 46 हजार 500 रुपये आणि 918 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.