
वैष्णो देवी परिक्रमा मार्ग विकास साठी ८० कोटी
बातमी थोडक्यात
जम्मू आणि काश्मीर मधील वैष्णो देवी परिक्रमा मार्ग विकसित करण्यासाठी सरकारने ८० कोटी रुपये दिले आहेत. या मार्गामुळे तीर्थयात्रेच्या पर्यटनाला चालना मिळेल आणि भाविकांसाठी पायाभूत सुविधा सुधारल्या जातील. दंडकोट, तोटे, देवीगढ, सुखल घाटी आणि देवीपिंडी या गावांना रस्त्यांची चांगली कनेक्टिव्हिटी मिळाल्याने स्थानिकांची वाहतूक समस्या कमी होईल. या नवीन मार्गामुळे ही गावे जोडली जातील आणि ३८.३२५ किमीचा रस्ता तयार होईल. हा रस्ता बहुतांशी नवीन मार्गांवर बांधला जाईल.