
नागपुरात सौम्य भूकंपाचा धक्का
बातमी थोडक्यात
नागपूर जिल्ह्यात ८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजून १७ मिनिटांनी २.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे केंद्र नागपूर शहराच्या २७ किलोमीटर आग्नेयेस होते. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं या भूकंपाची पुष्टी केली असून, हा भूकंप जमिनीच्या ५ किलोमीटर खाली होता. या भूकंपाने झालेल्या हानी किंवा जीवितहानीची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.